ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पुणे जिल्ह्यातील ‘त्या’ खुनाचा पोलिसांनी केला उलगडा !

१ जानेवारी २०२१ रोजी आर्डव गावाच्या हद्दीत पवना नदीपात्रात वडगाव मावळ पोलिसांना एका पुरुष जातीचा मृतदेह सापडला होता. सदर इसमाला गंभिर मारहाण करून त्याचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज बांधत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचा तपास करत वडगाव मावळ पोलिसांनी खूनाचा उलगडा केला असून खुनातील आरोपीला अटक केली आहे.आरिफ सिद्धीक शेख (वय २५ रा.थेरगाव काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, २ जून रोजी गुलटेकडी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात लावलेला मयताचा फोटो एका चहा विक्रेत्याने ओळखला.

सदर व्यक्ती ही किशोर दिनकर लोंढे असल्याचे व सध्या दीड वर्षा पासून थेरगाव, काळेवाडी मध्ये आपल्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर वडगाव पोलिसांनी मयताच्या बहिणीचा शोधला व मयताचे साहित्य दाखविले.

मयत किशोर लोंढे यास गांजा व दारू पिण्याची सवय असल्याने मित्रांची माहिती घेतली. त्यांच्या मोबाईलचा सिडीआर तपासला असता एकाच नंबर वरुन अनेकदा मोबाईल संपर्क केल्याचे आढळून आले. तो नंबर संगीता सांतराम दुबे (रा.थेरगाव काळेवाडी पुणे) या नावावर असल्याचे दिसून आले.

त्या महिलेचा पत्ता शोधला परंतु मिळाला नाही. त्यामुळे संशयित मोबाईल फोन वरून संपर्क झालेल्या अन्य एका फोनची माहिती घेतली असता तो फोन पुणे शहरातील वडारवाडी परिसरातील जेल मधून सुटलेल्या आरिफ सिद्धीक शेख याचा असल्याचा व वाकड पोलिसांनी त्यास अटक केली असल्याची माहिती समजली.

वडगाव मावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील सर्व परिस्थिती पाहता सदर गुन्हा आरिफ सिद्धीकी शेख यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला वडगाव पोलिसांनी अटक केली.अशी माहिती वडगाव मावळचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली.पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, पोलीस हवालदार काळे, श्रीशैल कंटोळी, अमोल कसबेकर, गणेश तावरे, पो.ना. कदम, तावरे, अजित ननावरे यांनी ही कामगिरी केली.

You might also like
2 li