ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘राजकारणीच जाणीवपूर्वक पसरवितात अंधश्रद्धा’

 “राजकारणात पुष्कळ अंधश्रद्धा असून राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात. त्यात त्यांचे हित आहे, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

अंनिसच्या ई मासिकाचे प्रकाशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नव्याने सुरू केलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या ई-मासिकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात डॉ. यशवंत मनोहर बोलत होते

विचारशक्ती नष्ट झाल्याने अंधश्रद्धा

“सर्व धर्ममार्तंड हे समाजव्यवस्थेच्या धुरीणांचे चाकर असतात. त्यांच्या मदतीने हे धुरीण अंधश्रद्धांचा फैलाव करतात.

लोकांनी विचार करणे, प्रश्न विचारणे हे व्यवस्थेच्या धुरीणांना अडचणीचे असते. त्यामुळे लोकांची विचारशक्ती हे धुरीण नष्ट करतात आणि मग लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धा हा लोकमान्य धंदा

डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, ‘अंधश्रद्धा हा एक धर्ममान्य आणि लोकमान्य धंदा बनला असून ते बुद्धी चुकार लोकांचे विश्रामगृह आहे. आळशी लोकांसाठीचे ते आयोजन, तत्वज्ञान, शॉर्टकट आहे.

माणूस भयग्रस्ततेने परावलंबी होऊन बुद्धिपासून दूर जातो; मात्र विचार करणारी बुद्धी ही मानवी अस्तित्वाचे सत्व आहे. ते सत्व गमावले, की माणूस म्हणून जगण्यासारखे व्यक्तीकडे काही रहात नाही.”

 

You might also like
2 li