मुंबई – दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोनियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan Teaser) उर्फ ​​’पीएस 1′ चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र काही काळापूर्वी या चित्रपटाबाबतचे तपशील येऊ लागले आहेत. आता पोनियिन सेल्वनचा टीझरही (Ponniyin Selvan Teaser) रिलीज झाला आहे. त्याची कथा चोल साम्राज्याशी संबंधित असून हा चित्रपट (Ponniyin Selvan) जबरदस्त असणार आहे हे टीझरवरून स्पष्ट होते.

मणिरत्नम चार वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्याने शेवटचा 2018 मध्ये चेक चिवंथा वाणम हा चित्रपट बनवला होता.

यानंतर आता तो लवकरच पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan)  हा चित्रपट घेऊन येत आहे. चोल साम्राज्यात सुरू असलेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

भारतातील पिरियड चित्रपटांपैकी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.’पोनियिन सेल्वन’चा टीझर (Ponniyin Selvan Teaser) एकदम आलिशान आहे.

टीझरमध्ये तुम्हाला विक्रम, किच्चा सुदीप आणि जयम रवी दिसत आहेत. या टीझरमध्ये मोठी जहाजे, हत्ती-घोडे आणि राजवाडे पाहायला मिळतात.

याशिवाय तुम्ही ऐश्वर्या राय बच्चन आणि त्रिशा यांनाही अतिशय सुंदर लूकमध्ये पाहू शकता. हा चित्रपट एकदम जबरदस्त असणार आहे हे या टीझरवरून स्पष्ट झाले आहे.

पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan ) चित्रपटाची कथा 10 व्या शतकातील चोल राजवंशावर आधारित आहे.

यामध्ये कावेरी नदीचा मुलगा पोन्नियिन सेल्वन हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा शासक होण्यापूर्वीचा राजा चोल याची कथा दाखवली जाणार आहे.

चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमानने दिले आहे. हा चित्रपट (Ponniyin Selvan) 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन साऊथ स्टार विक्रम, त्रिशा, जयम रवीसोबत दिसणार आहे. चित्रपटाचे रिलीज झालेले पोस्टर्स पाहून चाहते खूप खूश झाले होते

आणि अशाच परिस्थितीत आता टीझर समोर आल्याने चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. पोनियिन सेल्वन हा भारतातील सर्वात मोठा बजेट चित्रपट आहे. त्याचे एकूण बजेट 500 कोटी सांगितले जात आहे.