व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याची प्रकार सांगवीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.१८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेसेज पाठविणाररा मोबाईल क्रमांकधारक अज्ञात इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलेला एका मोबाईल क्रमांकावरून अज्ञात इसमाने अश्लिल मेसेज पाठविले.
Advertisement
अश्लिल शब्द वापरून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार १७ ते १८ जून २१ दरम्यान घडला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.