file photo

मुंबई : आॅनलाईन कार्यालयीन बैठक सुरू असताना एका कर्मचा-याची पत्नी अर्धनग्न स्थितीत पतीजवळ आल्याचा प्रकार ताजा असताना आता तर आॅनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

टवाळखोरांचा प्रताप

मुंबईतील महाविद्यालयाचा ऑनलाईन वर्ग सुरू असताना अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

या प्रकरणात गुन्हा नोंदवून जुहू पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. विलेपार्ले भागातील संबंधित कॉलेजचा ऑनलाईन क्लास सुरू असताना टवाळखोरांनी पॉर्न व्हिडिओ सुरु केल्याचा आरोप आहे.

Advertisement

ऑनलाईन शिक्षणातही अडी-अडचणी

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालयं अद्यापही बंद आहेत; मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

संसर्गाच्या भीतीमुळे शाळा किंवा महाविद्यालयात जाणे शक्य नाही, म्हणून विद्यार्थी आपापल्या घरातून ऑनलाईन वर्गात सहभागी होत आहेत.

शिक्षक-प्राध्यापकही आपल्या परीने कुठलीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घेत आहेत; मात्र अशात काही टवाळखोर या शिक्षणातही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

नेमकं काय घडलं?

मिळाल्या माहितीप्रमाणे विलेपार्ले येथील संबंधित महाविद्यालयाचा ऑनलाईन वर्ग जेव्हा सुरू झाला, तेव्हा काही अज्ञात आरोपींनी अश्लील व्हिडीओ अपलोड केले.

वर्ग सुरू असतानाच पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात गुन्हा नोंदवून जुहू पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्राध्यापकांच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा

जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, हे प्रकरण चार दिवसांपूर्वीचे आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकाने याबाबत तक्रार केली होती,

Advertisement

त्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 292, 570 आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलिसांबरोबरच मुंबई सायबर सेलचे अधिकारीही संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.