पुणेः चोरून, लपून जुगार अड्डे सुरू असतात. पोलिस छापेही टाकतात; परंतु पोलिस ग्रामीण पोलिसांनी केलेली कारवाई धडकी भरावी, अशीच आहे. एकाच वेळी ७२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, आतापर्यंतची ही मोठी कारवाई असल्याचे मानले जाते.

अवैध धंदे करणा-यांचे दणाणले धाबे :- पत्त्याच्या क्लबवर टाकलेल्या छाप्यात ६० जणांवर कारवाई करून एक लाख ४४ हजार २१० रुपये रोख रकमेसह १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी व जुगार खेळण्याची साधने जप्त करण्यात आली आहेत,

तर युनिट ६ ने मटक्यावर घातलेल्या छाप्यात १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी ९२ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणा-यांना चांगलाच दणका बसला आहे.

Advertisement

प्रतिष्ठितही ताब्यात :- उरुळी कांचन भागात पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल गारवानजीक खेडेकर मळा येथे संजय बडेकर याने जुगार अड्डा सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली होती,

याची शहनिशा करण्यासाठी उपायुक्त श्रीनिवास घाडगे हे पथकाबरोबर मध्यरात्री गेले असता त्यांना येथे रम्मीचा खेळ सुरू होता. येथे कारवाई करून हा अड्डा चालवणारे बडेकर याच्यासमवेत अनिल कांचन, अतुल उर्फ आप्पा कांचन व योगेश उर्फ बाळा कांचन या भागीदारासह ६० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हिमनगाचे टोक :- याच भागातीव मटका अड्ड्यावर छापा टाकून मटका चालक मंगेश कुलकर्णी याच्यासह १२ जणांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या दोन्ही कारवाया एका गावात व एकाच वेळी झाल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

Advertisement

ही कारवाई हिमनगाचे छोटे टोक मानले जात आहे. कारण लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या प्रत्येक गावात अवैध दारू विक्रीसह जुगार व मटक्याचे अड्डे व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

 

Advertisement