नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी ‘आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य आहे’ तसेच महाराष्ट्रातील (Maharashatra) लोकांमध्ये आणि इथल्या मातीत खासियत आहे, असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राची स्तुती केली आहे. यावेळी ते राजभवन (Raj Bhavan) येथील नवीन हॉलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राविषयी असलेले प्रेम व आदर व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सांगितले की गेल्या साडेचार वर्षात मी १२ वेळा महाराष्ट्रात आलो आहे. यामुळे महाराष्ट्राची जनता आणि नेत्यांचे मी अभिनंदन करतो.

महाराष्ट्रातील लोकांमध्ये आणि इथल्या मातीत खूप खासियत आहे. त्यामुळेच मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात येतो. गेल्या साडेचार वर्षात अनेक वेळा मी महाराष्ट्रात आलो आहे.

Advertisement

यावेळी राजभवनाच्या हॉलच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan), पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे(Aditya Thackeray) उपस्थित होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राने (Maharashatra) देशात कोरोना पसरविल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर त्यांच्या या विधानावर सर्वस्थरावरून टीका करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्राने कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविले. त्यामुळे देशात कोरोना पसरला, असा आरोप मोदी यांनी संसदेत केला होता.

Advertisement

त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचे इशारे देण्यात आले होते. तसेच काँग्रेसकडून संविधान चौकात आंदोलन करण्यात आले होते.