राजकीय नेते कधीही पक्षाच्या कार्यापासून कधीच दूर जात नाही. २४ तास राजकारण आणि पक्षीय काम असं राजकीय नेत्यांच्या बाबतीत होत असतं; परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर मात्र आपल्या वेगळेपणामुळं प्रसिद्ध आहेत.

आताही त्यांनी व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

रेखा ठाकूर प्रभारी अध्यक्ष

व्यक्तिगत कारणांसाठी आपण पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिन्यांसाठी दूर राहणार असल्याची घोषणा आंबेडकर यांनी केली आहे.

Advertisement

या तीन महिन्यांच्या काळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत, यासाठी त्यांनी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांना सहकार्य करून पक्षाचे कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.

निवडणुकीसाठी प्रभारी अध्यक्ष

मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. पक्ष चालला पाहिजे. आपण आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Advertisement

राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत, म्हणून पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. अरुण सावंत, वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्त्यांनी ठाकूर यांना मदत करून पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल करू या, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

 

Advertisement