मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या प्रकरणावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वातावरणाला वादळाचे स्वरूप आले आहे. भाजप नेतेही पत्रकार परिषद घेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आहे. दिशा सालियनवर (Disha Salian) बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या (Sushant Singh) इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

Advertisement

आमच्याकडेही काही माहिती आहे. ८ जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिने आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितले.

ती थांबली नाही. त्यानंतर कोण होते. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होते. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचे होते.

तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील ८ जूनची पाने कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता असे अनेक प्रश्न नारायण राणे यांनी विचारले आहेत.

Advertisement

सुशांत सिंह प्रकरणावर नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणले, हे सारे सुशांत सिंगला जेव्हा कळलं, तेव्हा तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले.

त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कुठे झाले. १३ जूनला गायब झाले.

त्याआधी होते. सोसायटीतील लोक सांगतात. ठराविक माणसांची अॅम्ब्युलन्स कशी आली. हॉस्पिटलला त्याला कोणी नेले. याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे ही उघड होणार.

Advertisement

तेही माहिती करतील सर्व. रमेश मोरेंची हत्या कुणी केली. का केली कुणी केली. त्यांची कुणाचा संबंध नव्हता. जयंत जाधवची हत्या का झाली.

आम्ही काढले नाही. खोलात जाईल हे आम्हाला माहीत नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisement