गुन्ह्यात आता महिलाही मागे नाहीत. त्याही कुठल्याही थराला जाऊ शकतात. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणींना चुंबन घेताना रोखल्याचा राग आल्याने तरुणींनी आश्रमातील वृद्ध महिलेला मारहाण केली. त्यात महिलेचा दात तुटला आहे.

व्यसनमुक्ती केंद्रातील प्रकार

सिंहगड रस्ता परिसरातील एका व्यसनमुक्ती केंद्रात दोन तरुणींना चुंबन घेताना रोखल्याच्या रागातून त्यांनी इतर दोघींच्या साथीने ६४ वर्षीय केअर टेकर महिलेला बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात चार तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

Advertisement

काय घडले ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एका व्यसनमुक्ती केंद्राच्या केअर टेकर आहेत. फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी व्यसनमुक्ती केंद्रात दोन तरुणी एकमेकांचे चुंबन घेत होत्या. त्या वेळी फिर्यादी त्या ठिकाणी आल्या.

त्यांनी या तरुणींना चुंबन घेण्यापासून रोखले. तसेच, व्यवस्थापनाकडे तक्रार केली. केअर टेकर महिलेल्या कृतीमुळे चिडलेल्या तरुणींनी इतर दोन तरुणींच्या मदतीने त्यांना बेदम मारहाण केली.

आरोपींनी मारहाण करून त्यांचा दात तोडला. फिर्यादी उपचारासाठी मुंबईला गेल्या. उपचार केल्यानंतर त्या पुण्यात परतल्यानंतर त्यांनी तक्रार दिली.

Advertisement