नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रविदास जयंती २०२२ (Sant Ravidas Jayanti २०२२) निमित्त दिल्लीतील (Delhi) करोल बाग येथे कीर्तनाला हजेरी लावली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात उपस्थित महिलांमध्ये बसून मंजिरा वाजवला आहे.

रविदास जयंतीनिमित्त मंदिर आणि मठांमध्ये कीर्तन-भजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी श्री गुरु रविदास धाम मंदिरात आयोजित केलेल्या शब्द कीर्तनाला मोदींनी हजेरी लावली आहे.

पीएम मोदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, संत रविदासांनी जातिवाद आणि अस्पृश्यता यासारख्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते.

Advertisement

माझ्या सरकारने प्रत्येक पावलावर आणि योजनेत गुरु रविदासांची भावना आत्मसात केली आहे,असे मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)हे देखील आज उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी येथील रविदास मंदिराला भेट देणार आहेत.

गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी यात्रा काढल्या जातात. यासोबतच अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी संत रविदासांचा जन्म झाल्याचे मानले जाते.

Advertisement

तसेच आज १६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होत असल्याने आजचा दिवस संत रविदासांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते.

 

Advertisement