मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि आज संसदेत भाषण केले यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून कोरोनाचा जास्त पसार झाल्याचे म्हंटले आहे. त्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेस (Congress) नेते नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचे म्हंटले आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी धन्यवाद प्रस्तावावर काल बोलताना महाराष्ट्राचा (maharashtra) अपमान केला.

हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान आहे. त्यामुळे मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी.

Advertisement

मोदींनी माफी न मागितल्यास उद्या राज्यभरात भाजपच्या (BJP) कार्यालयाबाहेर आंदोलने केली जातील असा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. मोदींच्या भाषणावरून राज्यात चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलताना म्हणाले की, राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रति थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी टीकाही त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या सर्व नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली आहे.

Advertisement

त्यामुळे ते दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी षडयंत्रे रचत आहेत. आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे.

पंतप्रधान हे संपूर्ण देशाचा असतो याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत असे म्हणत पटोलेंनी मोदींवर टीका केली आहे.

Advertisement