पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे (Pune) दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यावेळी ते पुणे मेट्रोच्या (Metro) उदघाटनप्रसंगी पुण्यात येणार असून इतर विकास कामांचा आढावा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या महिन्यात पुणे दौरा स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती.

त्यावेळी मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होईल असे फडणवीस म्हणाले होते. परंतु आता मोदींच्या येण्याचा डाव भाजपकडून (BJP) अजित पवारांवर (Ajit Pawar) टाकण्यात आला आहे.

Advertisement

पुणे मेट्रोचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच होणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवला होता.

या दौऱ्यात मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे (Pune Metro)उद्घाटन, महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

यासह आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उदघाटन तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजनाचे कार्यक्रम या दौऱ्यात होणार आहे.

Advertisement

पुण्यातल्या मेट्रोवरून भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई रंगताना दिसून येत आहे. आता पंतप्रधान मोदीच मेट्रोच्या उद्घाटनाला येणार असल्याचे भाजपने टाकलेला डाव यशस्वी होताना दिसतोय.

यामुळे आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु मेट्रोच्या उद्घाटनावरून आणि श्रेयवादावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement