कलेला कोणतीही सीमा राहत नाही. देश, खंडाच्या सीमाही अस्सल कलाकृतीपुढं गळून पडतात. तिला जगन्मान्यता मिळते.

पुण्यात नाट्यक्षेत्रात काम करणा-या राजकुमार जरांगे यांच्या कलाकृतीनंही अशीच मान्यता मिळविली असून रशियातील पन्नास चित्रपटगृहात हा चित्रपट चालू आहे.

काळ चित्रपटाचे रशियन भाषेत डंबीग

राजकुमार जरांगेचा ‘काळ’ हा चित्रपट रशियन भाषेत डब केला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील युवा कलावंत राजकुमारची भूमिका असलेल्या ‘काळ’ या चित्रपटाचे डी. संदीप यांनी दिग्दर्शन केले असून नितीन वैद्य, रंजीत ठाकूर आणि हेमंत रुपेरी यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे शूटिंग कलाकारांनीच केलेले आहे.

Advertisement

यांच्या भूमिका

जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या या सिनेमात राजकुमार जरांगे सोबत सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयश बेहरे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघळीकर यांच्याही भूमिका आहेत.

जरांगे हा औरंगाबादेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना नाट्यक्षेत्राकडे ओढला गेला. पुरुषोत्तम करंडक, राज्य नाट्य स्पर्धांत त्याने भाग घेऊन सुरुवातीला नाव केलं.

द ट्री स्टोरी, वेत्रवतः, सुपारी, गिधाडे आणि गेल्या वर्षी भावकी या नाटकांतील भूमिकांबद्दल त्याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालं. यापूर्वी त्याने ‘घुमा’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. त्यानंतर, २०१८मध्ये काळ हा सिनेमा मिळाला.

Advertisement

असा झाला प्रवास

२०१६ला अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी काम मिळेल या अपेक्षेने राजकुमार पुण्यात आला; पण ही अपेक्षा फोल ठरली.

तसं काही झालं नाही मग महाविद्यालयात केलेल्या नाटकातील कामामुळे कला क्षेत्राशी आवड असल्याने सुदर्शन, भारत, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहात आणि ललित कला केंद्रातली नाटकं सातत्यानं पाहण्यास सुरुवात केली.

अतुल पेठे, सतीश आळेकर, अलोक राजवाडे आणि ललित कला केंद्र यांच्या नाटकांनी राजकुमारचा नाटकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर श्रीकांत प्रभाकर, प्रदीप वैद्य यांच्याकडे फिजिकल थिएटर आणि नाटक या विषयावर कार्यशाळा केल्या.

Advertisement