Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

खासगी रुग्णालये भरमसाठ बिले घेतात,हातावरचे पोट असणारे नागरीक झाले हवालदिल !

खासगी रुग्णालयात भरमसाठ बिले आकारणी केली. त्यामुळे सामान्य नागरीक, हातावरचे पोट असणारे नागरीक हवालदिल झाले आहेत, अशी तक्रार पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी महापौर ढोरे यांनी खासगी रुग्णालयाबाबत आरोग्यमंर्त्यांकडे तक्रार केली.

त्या म्हणाल्या की, काही खाजगी रुग्णांलयांत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिले भरण्याबाबत पाठपुरावा करण्यात येतो.

Advertisement

याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येत असतात. याबाबत रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यासाठी खासगी रुग्णालयांचे ऑडिट करावे.

जेणेकरुन रुग्णालयांच्या दरांमध्ये सुसूत्रता येईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच, कोरोना तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने व म्युकरमायकोसिस रोगाबाबतीत योग्य ती उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही महापौर ढोरे यांनी केली.

Advertisement
Leave a comment