Priyanka Chopra- Nick Jonas: प्रियंका चोप्राने 16 सप्टेंबर रोजी पती निक जोनासचा 30 वा वाढदिवस (birthday) त्याच्या मित्र आणि कुटुंबासह (friends and family) साजरा केला. प्रियांका चोप्राने गोल्फ-थीम (golf theme) असलेली पार्टी आयोजित केली होती आणि या प्रसंगी सुंदर पांढरा स्लिप ड्रेस (white slip dress) परिधान केला होता.

निकची निवड (nick’s choice) लक्षात घेऊन प्रियांका चोप्राने गोल्फच्या थीमवर ही पार्टी दिली. गोल्फ थीमवर कपकेक होते (cup cake), पांढरा ड्रेस कोड होता (white dress code), गोल्फचा खेळ खेळला गेला (played golf) आणि बरेच काही.

व्हिडिओ पोस्ट करताना प्रियांकाने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे माय लॉब. तुमच्या आयुष्यात सदैव आनंद आणि चेहऱ्यावर हसू येवो. मी तुझ्यावर प्रेम करते निक या आठवड्याच्या अखेरीस माझे मन खूप भरून आले. याची सुरुवात माझ्या पतीच्या वाढदिवसापासून झाली पण अखेरीस खूप काही घडले. निकचे मित्र आणि कुटुंबीयांनी हा प्रसंग प्रेम आणि आनंदाने भरला.

यावेळी प्रियांका चोप्राने पूर्ण पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. कारण पांढरा ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

यादरम्यान निकने ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये प्रियांकाला कंपनी दिली. दोघेही खूप क्यूट दिसत होते.