लस उत्पादनात पुण्याचे नाव जागतिक पातळीवर घेतले जाते. कोरोनाविरोधातील लढ्यातही पुण्याचा मोठा वाटा आहे. आता कोरोनावरच्या तिस-या लसीचं उत्पादनही पुण्यात होणार आहे.

‘सीरम’ चे मोठे योगदान

कोरोनाविरोधी लढ्यात आता पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने आणखी एक पाऊल टाकलं आहे. पुण्यात कोरोनावरची तिसरी लस तयार होणार आहे.

ऑक्सफोर्ड, नोवोवॅक्सच्या कोरोना लसीनंतर आता रशियाची कोरोना लसही पुण्यात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सीरम’ मध्ये रशियन कोरोना लस ‘स्पुटनिक व्ही’ चं उत्पादन घेण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

Advertisement

‘सीरम’चा रशियन कंपनीशी करार

‘सीरम इन्स्टिट्यूट’ने रशियन ‘डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड’शी (आरडीआईएफ) करार केला आहे. ‘सीरम’ सप्टेंबरपासून रशियाच्या स्पुटनिक लसीचं उत्पादन सुरू करेल. यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

भारतात दरवर्षी या लसीच्या तीन कोटीपेक्षा अधिक डोसची निर्मिती करण्याचं लक्ष्य आहे. या लसीची पहिली बॅच सप्टेंबरमध्ये मिळण्याची अपेक्षा आहे.

अधिक प्रभावी

ही लस कोरोनाविरोधात 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे. रशियाने सर्वात प्रथम या लसीला मंजुरी दिली होती.

Advertisement

त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ही लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात.

पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर 28 ते 42 व्या दिवसांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होते.

 

Advertisement