पुणे : गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या आणि नुकत्याच एका आजारातून बाहेर आलेल्या प्राध्यापकाने आपल्या मुलीला ‘साॅरी गुडी’ अशी फेसबुक पोस्ट टाकत आत्महत्या केली.

नैराश्याबरोबरच जीवनालाही निरोप
फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन’ असा मेसेज लिहून प्राध्यापकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सासवडजवळील भिवरी गावात ही घटना घडली. प्रफुल दादाजी मेश्राम (वय 45) असं आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

गेले काही महिने आत्ममग्न
प्रफुल्ल दादाजी मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात नोकरी करत होते. गेले काही दिवस ते कुणाशीही बोलत नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

‘बाय बाय डिप्रेशन.’ ‘सॉरी गुड्डी’ फेसबुक पोस्ट
मंगळवारी दुपारच्या सुमारास ‘बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी’ अशी एक पोस्ट लिहून भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं.

फेसबुकवरील पोस्ट वाचून अनेकांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत त्यांनी अखेरचं पाऊल उचललं होतं. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी, मित्रांनी शोधाशोध सुरू केली. काही तासाने एका व्यक्तीने विहिरीत आत्महत्या केल्याचं वृत्त आलं.

पोलिस घटनास्थळी गेले असता मेश्राम यांचा मृतदेह सापडला. या आत्महत्येमागचं नेमकं काय कारण असावं, याचा तपास सासवड पोलिस करत आहेत.

Advertisement