file photo

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुण्यालगतची २३ गावे समाविष्ट करण्याचा विषय प्रस्तावित होता. आता त्याची सुनावण झाली असून त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राज्य सरकारला पाठविणार आहे.

विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव पूर्वीच सादर

महापालिकेच्या हद्दीत गावे समाविष्ट करण्याबाबत यापूर्वी विभागीय आयुक्तांकडून नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या.

त्यावर सुनावणी घेऊन आपल्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला आपला अहवाल यापूर्वीच सादर केला आहे;

Advertisement

परंतु गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांचे म्हणणे विचारात घेणे आवश्यक असते.

महिनाभरात गावे होणार समाविष्ट

जिल्हाधिका-यांनी सुनावणीनंतरचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर राज्य सरकार त्यावर महिनाभरात निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरात गावे पुणे महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

Advertisement