फँड्री’चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश्वरी खरात हिची ‘रेड लाईट’ नावाची एका शॉर्ट फिल्म नुकतंच रिलीज झाली.

यात ‘रेडलाईट’ परिसरात काम करणाऱ्या महिलांबाबतचे विदारक वास्तव्य मांडण्यात आलं आहे. नुकतंच राजेश्वरीने याबाबत एक भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. “तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या. स्त्रीने असे काम करणे योग्य नव्हे.

परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा,

आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. गल्लीकडे येताना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की.

थोडावेळसाठीच खेळणं घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईलच्या रिचार्ज पेक्षा कमी किंमत देता.

सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिंमत ठेवतात का? नाही,

कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात,” अशा शब्दात राजेश्वरीने या सर्व गोष्टींवर टीका केली आहे.