आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१०) दुपारी करण्यात आली.

लॉज चालक सतीश कुमार शेट्टी (वय ४१ रा. ठाणे), लॉज मॅनेजर सतीश गौडा (वय ३५, रा. साई पॅलेस लॉज, आळंदी फाटा, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

Advertisement
आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली.

त्यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली आहे. आरोपींनी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

Advertisement