Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

शिवसेनेच्या ‘या’नेत्याचे पंकजा मुंडे यांना शिवसेनेते येण्याचे जाहीर आमंत्रण

पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल.

तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल, अशा शब्दांत गृराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पंकजा यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले.

नाराजीच्या पार्श्वभूमीवरचं निमंत्रण

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

Advertisement

त्यावरून राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं होते. त्यावरून शंभुराजेंनी पंकजा यांना थेट शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे.

कार्यकर्त्यांना धीर

गेल्या काही दिवसांपासून पंकजा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं होतं.

या पार्श्वभूमीवर खुद्द पंकजा यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा.

Advertisement

एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

पंकजा काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे.

योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”

Advertisement

 

Leave a comment