file photo

पुणे : खांदवे (Khandave) येथे नगर रोड (Nagar Road) येथे भीषण अपघात (Accident) झाला आहे. वाळुचा डंपर (Dumper) कारवर (Car) पलटल्यामुळे रस्त्यावर वाळू (Sand) सांडली आहे. वाळूचा डंपर कार्वरवर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अपघातामुळे वाहतूक कोंडी (Traffic) झाली होती. पोलीस रस्त्यावरील वाळू आणि डंपर ला बाजूला करण्याचे प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, वाळूचा डंपर वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गल्लीतून येणाऱ्या गाडीवर डंपर गेला. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे.

Advertisement

गाडीतील व्यक्तींना अनियंत्रित झालेला ट्रक त्यांच्या दिशेने येताना दिसल्यावर ते लगेच गाडीबाहेर पडले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गाडीतील लोकांना किरकोळ जखमा (Injuries) झाल्या आहेत. पुढील तपास वाघोली पोलीस (Vagholi Police) करत आहेत.

Advertisement