पुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. अश्यातच पुण्यात अपघाताची (Pune Accident) एक घटना समोर आलीय. पुलाच्या कठड्याला धडकून कारचा भिषण अपघात झाला असून, यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड (sinhagad) रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत संत धर्माजी महाराज मंदिरापासून काही अंतरावर पुलाच्या कठड्याला धडकून कारचा भिषण अपघात (Pune Accident) झाला आहे.

या अपघाताची (Pune Accident) तीव्रता एवढी होती की कारची पुढची दोन्ही चाके, इंजिन व इतर भाग तूटून बाजूला पडले होते. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने जीवीत हानी झालेली नाही.

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे जवळच असलेल्या हॉटेलच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले आहे. कारची अवस्था पाहून नागरिक अपघाताच्या (Accident) तीव्रतेबाबत चर्चा करताना दिसत होते.

मिळाल्या माहितीनुसार, डोणजे बाजूकडून पुण्याकडे येत असताना हा अपघात झाल्याचे दिसून येत असून अपघाताच्या अगोदर सुमारे चाळीस ते पन्नास मीटर अंतरापासून कार मुख्य रस्ता सोडून बाजूने येऊन पुलाच्या सिमेंट कॉंक्रिटच्या कठड्याला जोरात धडकली आहे.

अपघाताचा आवाज ऐकून जवळच असलेल्या हॉटेलचे सुरक्षारक्षक मदतीसाठी धावले. सुरक्षारक्षकांनी गाडीत अडकलेल्या एकाची सुखरूप सुटका केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

मात्र, दुसरीकडे पाहायला गेलं तर रस्त्याच्या कडेला एवढा मोठा अपघात घडला असताना व चारचाकी पुलावर अडकलेली दिसत असताना पोलिसांना (police) मात्र या अपघाताबाबत कोणतीही माहिती नव्हती.

काही वेळा नंतर हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी संपर्क साधला असता कोणीही खबर दिलेली नसल्याचे तसेच जखमींबातही कोणत्याही रुग्णालयाकडून एमएलसी आलेली नसल्याचे यावेळी सांगण्यात आलं आहे.