पुणे : एका मालवाहू (Cargo) गाडीने दुचाकीस्वाराला (Two wheeler) धडक दिल्याने २ जणांचा जागीच मृत्यू (Death) आला आहे. तर एक जण गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. शहरातील चाकण आंबेठाण रस्त्यावर (Chakan Ambethan Road) ही घटना घडली आहे.

३ युवक दुचाकीवर चालले असताना मालवाहू गाडीने त्यांना कोरेगाव फाटा (Koregav Fata) येथे धडक दिली. एम.एच.१४ जे.जे. ३१७२ असा गाडीचा नंबर आहे.

हे तरुण चाकणच्या औद्योगिक वसाहतीत (Industrial Estate of Chakan) कामाला जात असताना ही घटना घडली आहे.

Advertisement

ही अपघाताची सर्व घटना रस्त्या शेजारील सीसीटीव्ही मध्ये (CCTV) कैद झाली आहे. केतन माणिकराव धोंडगे (वय.19) आणि विलास आनंदराव घुले (वय. २२) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

गोरख जकाते अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या तरुणाला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघात झाल्यानंतर मालवाहतूक गाडीचा (Driver) चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना तेथील नागरिकांनी त्याला पकडले आहे. राहुल पोपट वाळूंजकर असे मालवाहतूक गाडी चालकाचे नाव आहे.

Advertisement

मालवाहतूक गाडी चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. म्हाळूंगी पोलीस (Mahalungi police) स्थानकात गाडी चालकावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण (Sub-Inspector of Police Dinesh Chavan) अधिक तपास करीत आहेत.

Advertisement