file photo

पुणे : येथील हडपसर (Hadapsar) मध्ये मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये डंपरने (Dumper) रस्त्यावरील पादचाऱ्याला (Pedestrian) उडवले आहे. या अपघातात (Accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हडपसरमधील गाडीतळाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी (injured) झालेल्या पादचारी नागरिकावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार सुरु आहेत.

बंटर शाळेच्या समोरील रस्त्यावर डंपरने पादचाऱ्याला उडवले आहे. डंपरचे चाक पादचाऱ्याच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

Advertisement

जवळच असलेल्या नागरिकाने धाव घेऊन जखमीला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये पादचाऱ्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला आहे.

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर ट्रॅफिक झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल झाले.

पाळण्याच्या तयारीत असलेल्या डंपर चालकाला (Dumper driver) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.

Advertisement

तसेच सासवड रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हडपसर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी डंपर बाजूला घेऊन वाहनांना मार्ग मोकळा करून दिला आहे.