पिंपरी चिंचवड – पुणे एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरने (Trailers) टेम्पोला (Trucks) धडक दिल्याने भीषण अपघात (Mumbai-Pune Express Highway Accident) झाला आहे. या भीषण अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Express) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

हा अपघात बोरघाटातील ट्राफिक पोलीस चौकीनजीक ट्रक आणि ट्रेलर (Trucks And Trailers) यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला आहे.

या अपघातामुळे ट्रेलर जागीच पलटी झाला असून, यात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ट्रेलरचे मोठं नुकसान झाले.

Advertisement

या दरम्यान, अपघाताची माहिती समजताच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहे.

चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रेलरने टेम्पोला धडक दिली होती. त्यामध्ये दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी डायव्हर्जनही आहेत.

Advertisement

दोन्ही बाजूंना लोणावळ्याजवळ 1000 मीटर लांबीच्या मार्गावर लेन जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल,

असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीदिवसांपूर्वी सांगितले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Advertisement

गॅस टँकर विरूद्ध बाजूला कारला धडकला. त्यात या कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.