पुणे – साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला आणि मोठा अपघात झाला आहे. या अपघातात (Pune Accident) तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

विशेष म्हणजे पहिल्या अपघाताची बातमी ताजी असताना लगेच तासाभरात दुसरा अपघात (Pune Accident) झाला. भरधाव कंटेनरने तीन गाड्यांना धडक दिली. त्यामुळे संबंधित अपघाताची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही.

दरम्यान, नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर (Pune Accident) खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबंधित परिसरातील अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केल्याची बातमी समोर आली होती.

मंगळवारी सकाळी पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली. नवले पुलावरील 48 वाहनांच्या अपघाताच्या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार पोलीस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने सोमवारी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचविल्या होत्या.

दरम्यान, पुण्यातील नवले पुलावरील (Navale Bridge) अपघातस्थळाची सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी रस्त्याची रचना, महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.

या मार्गावर अपघात का होतात? याची योग्य माहिती घेऊन रोड एक्स्पर्टकडून त्रुटी दूर करायला हव्यात. अपघात सातत्याने होत असेल तर त्यावर उपाययोजना करुन अपघाताची संख्या शून्यावर कशी येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.