पुणे – पुण्यातील (Pune) कात्रज (katraj ghat) घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात (accident) झाला आहे. मात्र, यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच उडाली आहे. घाटात झालेल्या अपघातात अमोल टकले ( वय 18 वर्ष रा. भवानी पेठ) याचा मृत्यू झाला असून पवन सुभाष जाधव हा या अपघातात (accident) गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या अपघातामुळे (accident) घाटात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

नाशिक-सांगली ही राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून कात्रज घाटातून सातारच्या दिशेने जात होती. दुचाकीवरील दोघे खेड शिवापूरहून घाटातून पुण्याकडे येत होते. घाटात तीव्र उतारावर ‌बस आणि दुचाकीचा अपघात (accident) झाला.

या अपघातात तरुण जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. दरम्यान, जखमीला उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सदरील झालेल्या अपघातामुळे कात्रज चौकाकडून जुन्या बोगदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. वाहनांच्या वेगमर्यादेचं पालन न केल्यानेच यातील बहुतांश दुर्घटना घडतात.

अशा अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नियमांचं पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.