पुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. पुण्यात (pune) सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात घडला असून, हा अपघात इतका भयानक होता की… यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी पुणे शहर परिसरातील हडपसर (Hadapsar Accident News) भागात अपघाताची एक दुर्दैवी घटना घडली आहे. सिमेंट वाहतूक करणाऱ्या मिक्सरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली आहे.

या घटनेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात हा भीषण (Hadapsar Accident News) अपघात घडला आहे. या पघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यावेळी रिक्षामध्ये असलेला चालक कंटेनरखाली दबला गेला आणि त्याचा जागीच जीव गेला. रणजीत माणिक जाधव (रा. मुंढवा) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने हा टँकर भरधाव वेगाने येत होता. आकाशवाणी केंद्राजवळील रविदर्शन चौक ओलांडून हा टँकर अमरबाग सोसायटीसमोर आला असता,

समोरून उलट दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर एका कारसह तीन रिक्षांना धडक देऊन पुढे गेला. त्यानंतर टँकर रस्त्याशेजारील झाडावर जोरदार धडकला.

ही धडक इतकी जोरदार होती की हे झाडही या धडकेत तुटून एका रिक्षावर पडले आणि रिक्षामध्ये असलेला चालक दबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, महामार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती. हा मिक्सर पुण्याकडे निघाला होता. मात्र, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस (police) तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.