पुणे – पुणे शहरातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली असून, या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर (navle bridge) आज मोठा अपघात असला असून, या अपघातात (Pune Accident) तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

दरम्यान, या अपघातामध्ये (Accident) तब्बल 50 ते 60 जण गंभीर जखमी झाले असून, अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे. मात्र, या भीषण अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे.

टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवरील 30 वाहनांना जोरदार धडक बसली आहे. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजून तरी जखमींचा आकडा समजला नाही.

दरम्यान, या भीषण अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना नवले रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. तसेच पोलीस अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहे.

नवले पुलावर (navle bridge) याआधीही अनेक वेळा भीषण अपघात झाले आहे ज्या ज्यावेळी अपघात झाले आहेत, त्यावेळी प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करुनही यावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे या पुलावर वारंवार अपघात होत आहेत.