पुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. अश्यातच पुण्यात अपघाताची (Pune Accident) एक घटना समोर आलीय. हा अपघात दोन बसमध्ये झाला असून, यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यात हडपसर जवळ दोन पीएमटी बसचा (PMT Bus) अपघात झालाय. हडपसर परिसरातील गाडीतळ जवळ दोन पीएमपी बस एकमेकांना घासल्या गेल्या. या अपघातात (Pune Accident) दोन बसचं नुकसान झालंय.

अपघातानंतर संबंधित परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. वाघोलीकडे जाणारी बस (PMT Bus) सिग्नलला थांबली असता संबंधित घटना घडली.

या अपघातात दोन्ही बसच्या (PMT Bus) काचा फुटल्या असून इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. या दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत देखील झाली नाही.

दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले. तसेच स्थानिक नागरीक मदतीसाठी पुढे धावले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय.

सध्या पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पुण्यातील चांदणी चौका प्रमाणेच इतर भागामध्ये सुद्धा तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे शहरातील ही वाहतूक कोंडी कधी फुटणार असा सवाल नेहमीच पुणेकरांच्या मनात उपस्थित होत असतो.

आणि याच वाहतूक कोंडी मध्ये अश्या प्रकारचे अपघात झाल्याने नागरिक देखील चिंता व्यक्त करताना दिसून येतात. त्यामुळे अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाढती वाहतूक याकडे प्रशासनेने तात्काळ लक्ष घालून योग्य मार्ग काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.