पुणे : शरातील जनता वसाहत (Janta Vasahat) मध्ये असणाऱ्या कॅनॉलमध्ये एक रिक्षाचालक (Rickshaw Driver) रिक्षा (Rickshaw) वळवत असताना थेट रिक्षा कॅनॉलमध्ये (Canol) पडल्याची घटना घडली आहे. रिक्षाचालक अजूनही सापडला नसल्याची माहिती मिळत आहे.

रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट कॅनॉल मध्ये पडली. कॅनॉलच्या पाण्याला वेग असल्यामुळे रिक्षाचालक पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अग्निशामक दलाच्या (Fire brigade) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कॅनॉलमध्ये पडलेली रिक्षा अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढली. मात्र रिक्षाचालकांचा शोध लागलेला नाही.

Advertisement

अग्निशामक दलाच्या जवानांना १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाण्यातून रिक्षा बाहेर काढण्यात यश आले आहे. कॅनॉल च्या पाण्याला जास्त वेग असल्यामुळे रिक्षाचालक वाहून गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जनता वसाहत मधील कॅनॉल रस्त्यावर रिक्षाचालक रिक्षा वळवत होता. त्यावेळी रिक्षावरचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा कॅनॉलमध्ये पडली.

रिक्षाचालकाचा रिक्षा वळवण्याचा अंदाज चुकल्याने ही घटना घडली आहे. जवळच्याच अग्निशामक दलाच्या जवानांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

Advertisement

अंधार असल्यामुळे रिक्षाचा घेण्यासाठी अग्निशामक दलाला उशीर झाला. १ तासाच्या प्रयत्नानंतर रिक्षाचा शोध लावण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. मात्र रिक्षाचालकाचा शोध मात्र लागला नाही.