पुणे : शहरातील अपघाताचे (Accident) सत्र सुरूच आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर (Navle Bridge) ट्रकचा (Truck) ब्रेक फेल (Break fail) झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर ट्रक चालक (Truck driver) घटनास्थळ वरून फरार झाला आहे.

या घटनेमध्ये ट्रक चालकाने नवले ब्रिज येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना चिरडल्याची मोठी घटना घडली आहे. भूमकर पुलाच्या (Bhoomkar bridge) उतारावर या आयशर ट्रकचा (Eicher truck) ब्रेक फेल झाल्याने हा विचित्र अपघात घडला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकचा नवले ब्रिजवरून साताऱ्याच्या दिशेने भूमकर पुलाच्या उतारावर असताना ब्रेक फेल झाला.

Advertisement

यामध्ये ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या ३ लोकांना फरफटत नेले. यामध्ये तिघांचा मृत्यू (3 deaths) ​झाला आहे.

या विचित्र घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. ट्रकने काही चारचाकी वाहनांनादेखील धडक दिली आहे. ट्रकच्या धडकेत वाहनांचे नुकसान झाले आहे.

या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

Advertisement