पुणे – पुणे शहरातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली असून, या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर (navle bridge) काल रात्री मोठा अपघात असला असून, या अपघातात (Pune Accident) तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

दरम्यान, या अपघातामध्ये (Accident) तब्बल 50 ते 60 जण गंभीर जखमी झाले असून, कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या भीषण अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे.

टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवरील 30 वाहनांना जोरदार धडक बसली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की कित्येक गाड्यांचा चक्काचूर झाला. मात्र, आता नवले पुलावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे.

पुण्यातील नवले पुलावरील वाढते अपघात चिंता वाढवणारे आहेत. या पुलावर सतत अफाट होत असतात. दरम्यान, या घटनेमध्ये एक व्हिडिओ (Social Media Viral Video) मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ (Social Media Viral Video) एका महिलेचा असून, अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेमकं ही महिला काय म्हणती आहे, हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरुन बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यां खडेबोल सुनावताना दिसली आहे. हा व्हिडीओ साल 2021मधील असल्याची तारीखही व्हिडीओमध्ये दिसून येते. हा व्हिडीओ एका भाजप नेत्याच्या कार्यक्रमातील असल्याचाही दावा केला जातोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये महिला वेगान गाड्या चालवणं हे धाडसाचं काम नसून ते बेजबाबदार, लाचार आणि बेशिस्त असल्याचं लक्षण असल्याचं म्हटलंय. रस्त्यावर गाडी चालवताना वेगाला आवर घातला पाहिजे.

गाडी चालवणाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केलीच पाहिजे कारण हा जीव त्याला त्याच्या आईवडिलांनी दिलेला आहे, हे चालकांनी नेहमी लक्षात ठेवावं, असंही महिला म्हणाली आहे.