पुणे – दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि पुण्याच्या (pune) हवेची गुणवत्ता ढासळल्याची माहिती ‘सफर’ या संस्थेच्या निरीक्षणांवरून पुढे आली आहे. वाढलेली वाहने आणि दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे हवेच्या प्रदूषणात (Air pollution) भर पडली आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता (Air pollution) ही सर्वाधिक ढासळली आहे. त्या तुलनेत पुण्याच्या हवेची (Air pollution) गुणवत्ता ही तुलनेने चांगली आहे, असे देखील या संस्थेच्या निरीक्षणात पुढे आहे आहे.

दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत (Diwali) फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागविल्याचा परिणाम देशातील हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. त्यामुळे आता शहरी भागांमधील हवा बिघडली आहे.

मुंबई आणि पुण्यासह (pune) राज्यातील शहरगावांमध्येही वातावरणावर अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचे ‘सफर’ या संस्थेने नोंदविले आहे. सफर या संस्थेकडून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते.

पावसामुळे धूलिकण हे जमिनीवर राहत असल्याने हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात हवामान स्वच्छ राहते. मात्र, सध्या मान्सून हा परतला आहे. त्यात नुकतीच दिवाळी झाली असून फटक्यांच्या धूरामुळे हवेचे मोठ्या प्रमानाटत प्रदूषण झाले आहे.

त्यात वाहनांची संख्या देखील वाढली असून त्यामुळे देखील प्रदूषण वाढले आहे. सफरने केलेल्या पाहणीत मुंबईची हवा ही वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा वाईट ते मध्यम पातळीवर असल्याचे दिसून आले आहे.

मंगळवारी दुपारी पुण्याच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक ते वाईट या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात सुधारणा झाली मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर होती. असं ‘सफर’ने सांगितलं आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) ५० पर्यंत एक्यूआय असलेली हवा चांगली, १०० ते २०० एक्यूआयदरम्यानची हवा समाधानकारक, २०० ते ३०० एक्यूआयदरम्यानची हवा वाईट,

३०० ते ४०० एक्यूआय दरम्यानची हवा अत्यंत वाईट आणि ४०० एक्यूआयवरील हवा गंभीर मानली जाते. हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर असताना श्वास घेण्यास त्रास, दम लागणे असे प्रकार होऊ शकतात. सध्याच्या हवेत पुन्हा सर्दी-खोकला वाढण्याची भीती आहे.