पुणे – पुणेकरांसाठी (pune) महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून पुणेकरांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. होय.., कारण 1 ऑगस्टपासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) मध्ये फिरण्याकरता तुम्हाला आता रिक्षासाठी (Auto Riksha) अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे आता रिक्षा भाडेवाड (Pune Auto Price) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सामान्य पुणेकरांना रिक्षाने (Pune Auto Price) प्रवास करण्यासाठी थोडा जास्त खिसा खाली करावा लागणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरांनी सामांन्यांचे बजेट बिघडले आहे.

यातच आता आणखी एक झटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.

पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 2 रुपये अतिरिक्त आकारता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 1 रुपया आकारता येणार आहे.

आता रिक्षा चालकांना पहिल्या एक किलोमीटरसाठी 23 रुपये भाडे आकारता येणार आहेत. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये अकारणे बंधनकारक राहणार आहे.

येत्या 1 तारखेपासून नवे दर लागू होणार आहेत. इंधनाचे वाढते तर आणि रिक्षाचालकांची होणारी आर्थिक परवड पाहता परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतलेला आहे.

दरम्यान, पुणे शहरात रिक्षा भाडेवाढीसाठी आप रिक्षा संघटनेनं आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर पुणे आरटीओने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रिक्षा भाड्यात 2 रूपयांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये गॅसच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकणाऱ्या पुणेकरांना ही भाडेवाड जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याची प्रतिक्रिया पुणेकर देत आहे.