पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली असून, या यात्रेचा 66 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा (bharat jodo yatra) आजचा सहावा दिवस आहे. त्यामुळे सध्या मागील सहा दिवसांपासून आपल्या राज्यात भारत जोडो यात्रेची चांगलीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

या यात्रेमध्ये (bharat jodo yatra) महाराष्ट्रातील अनेक नेत्यांपासून हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळतय परंतु आता या भारत जोडो यात्रेचे पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लागले आहेत.

विशेषतः काँग्रेस पुणे (Pune) शहराच्या ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षा मोनिका खलाणे यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारची फ्लेक्स बाजी करण्यात आलेली आहे,

यामध्ये पुण्यातील टिळक रोड,लालबहादूर शास्त्री रोड,डेक्कन, आप्पा बळवंत चौक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडून फ्लेक्स बाजी करण्यात आलेली आहे

तसेच भारत जोडो यात्रेमध्ये 19 तारखेला पुण्यातून हजारो कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात शेगाव येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

तसेच राहुल गांधी यांच्याकडून सध्या देश जोडण्याचं काम सुरू आहे आणि या कामामध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे असे मत मोनिका खलाणे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, राज्यातील पाच जिल्ह्यातून जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेचा (bharat jodo yatra) प्रवास होणार आहे. यातील नांदेड जिल्ह्यातील यात्रेचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहोचली आहे.

राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवसात या यात्रेचा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.