पुणे : शहरातील (Pune City) काही भागात गुरुवारी (Thursday) पाणीपुरवठा बंद (Water supply cut off)  राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी येणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाची कामे करायची असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची तसेच स्थापत्यविषयक, विदुत आणि पंपाची कामे करायची आहे. येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील.

तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा (Low pressure water supply) होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar, Chief Engineer, Water Supply Department) यांनी दिली आहे.

Advertisement

शहरातील मध्यवर्ती भागासह, प्रगती, सिहंगड रस्ता, वडगाव आणि लष्कर परिसरातील पाणीपुरवठा येत्या गुरुवार पूर्ण दिवस बंद राहणार आहे.

कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पर्वती जलकेंद्र परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर,

Advertisement

शिवाजीनगर परिसर – स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, भवानी पेठ व नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

वडगाव जलकेंद्र परिसर – सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

लष्कर जलकेंद्र परिसर – पुणे कॅन्टोन्मेंट सर्व भाग, जांभुळकर मळा, रामटेकडी, हेवन पार्क, आशीर्वाद पार्क, हडपसर, सय्यदनगर, काळेपडळ, महंमदवाडी, ससाणेनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, केशवनगर

Advertisement

सोलापूर रोड, गोंधळेनगर, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी घोरपडी गाव व परिसर, वानवडीगाव, बी.टी. कवडे रोड

उदय बाग, कवडे मळा, मगरपट्टा, हांडेवाडी रोड, मंतरवाडी, सोलापूर रोड, डोबडवाडी, सोपानबाग, तसेच उत्तर बाजूस फातिमानगर, एस.व्ही.नगर परिसर, सेंट पॅट्रिक टाऊन, शेवकर वस्ती वरील सर्व भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement