पुणे – विद्येचे माहेर घर असणारे ‘पुणे शहर'(Pune) आता अपघातांचे (Accident) घर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पुणे शहरात गेल्या 24 तासांच्या आत तब्बल चार दुचाकीस्वारांनी (Pune Bike Accident) आपला जीव गमावला आहे. या घटने मुळे संपूर्ण शहरात (Pune) चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, हळहळ व्यक्त केली जाते आहे.

शहरातील पहिल्या अपघातात (Accident) झाड पडून दोघा बाईकस्वारांचा जागीच जीव गेला होता. तर दुसरी घटना पुणे महापालिकेच्या टर्फ क्लब चौकाच्या हद्दीत घडली आहे.

पुणे (Pune) पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने दुचाकीला धडक दिली. भरधाव कचऱ्याची गाडी दुचाकीला धडकली आणि यात दुचाकीवरील दोघेही जण दूरवर फेकले गेले.

मात्र, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत, पण उपचारादरम्यान या दोघांना मृत्यू झाला. या गघटनेमुळे सध्या शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत दगडू काळे हे 43 वर्षांचे होते. तर त्यांच्यासोबत दत्त पोपट काळे हे देखील निघाले होते. त्यांचं वय 40 होते.

हे दोघे ही श्रींगोद्यातील आढळगाव इथले रहिवासी असून, ते कामानिमित्त पुण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना अपघातात मृत्यू झाला.

तर दुसरीकडे मात्र भरधाव वेगाने आणि अत्यंत बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन घेत त्याला आणि अटकही करण्यात आली आहे.

दरम्यान, काही गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील पुणे शहरातील (Pune) चांदणी चौक (chandani chowk) परिसरात देखील ट्रक आणि पीएमपी बसचा भीषण अपघात (Accident) झाला होता.

सध्या पुणे शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढत असून, वाहन चालकांनी देखील आपली स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल.