पुणे – पुणे शहरात एका अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक (Pune Bike Theft) केलीय. हा चोरचा मागणीनुसार गाड्या चोरत असल्याचं पोलिसांच्या तपासातून (Pune Crime News) उघड झालंय. अजय झेंडे (Ajay Zende) (32) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून आत्तापर्यंत 20 हून अधिक दुचाकी (Bike) गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या चोराने हडपसर परिसरात 10 लाख रुपयांहून अधिक किंमतीची गाड्या चोरी केली आहेत. विशेष म्हणजे कुणाला चोरीचा संशय येऊ नये यासाठी तो पुणे शहराच्या बाहेर जाऊन गाड्यांची (Bike) चोरी करत असे.

सध्या आरोपी अजय (Ajay Zende) हा पोलिसांच्या (Police) ताब्यात असून, त्याची कसून चौकशी होत आहे. अजय मागणीनुसार गाड्या (Bike) चोरायचा. त्यानंतर गाड्यांचे नंबर प्लेट बदलून त्याच्या मित्राला विकायचा.

मित्र यल्लाप्पा बेल्ले या 34 मित्राला चोरलेल्या दुचाकी चोरून अजय पैसे कमवत होता. बेल्ले हा अजय झेंडे यांना गाडी चोरण्यासाठी सांगायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय झेंडे हा मूळचा दौंड चा असून पुण्यात तो किरकोळ कामे करायचा. पुण्यातील दुचाकी चोरून नंबर प्लेट बदलून तो त्याचा सोलापूर येथील मित्र यल्लाप्पा बेल्ले याला विकत असे.

बेल्ले हा जशी मागणी असेल त्यानुसार झेंडेला गाडी चोरण्यासाठी सांगायचा. कधी एका विशिष्ट कंपनीची गाडी हवी असेल तर बेल्ले हा झेंडे ला ती हवीय असे सांगून संशय येऊ नये म्हणून शहराच्या बाहेरील भागातून गाडी चोर असे आदेश द्यायचा.

झेंडे या गाड्या चोरून सोलापूर ला नेऊन बेल्लेकडे सोपवत असे. दौंड पोलिस ठाण्यात या आधी झेंडे वर ए टी एम फोडण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, आता पुणे पोलिसांच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 नी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. सध्या पुणे शहर आणि परिसरात अश्या प्रकारचे अनेक भुरटे चोर आढळत असून, पोलिसांनी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.