पुणे : महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातच आता महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Beedkar) यांनी पुणेकरांसाठी (Pune) काळा दिवस आहे असे म्हटले आहे.

बीडकर यांनी म्हटले की, राष्ट्रवादीने (NCP) एसीबीकडे (ACB) तक्रार करणे हा पुणेकरांसाठी घाणेरडा काळा दिवस आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant jagatap) यांना विकृतीने ग्रासलेले आहे.

तसेच ते आपल्या कृतीतून पुणेकरांच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहेत. महापालिका जे प्रकल्प राबवत आहे ते केवळ पुणेकरांच्या भल्यासाठी येत आहेत, असे गणेश बीडकर म्हणाले आहेत.

Advertisement

दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP)विरोधात राष्ट्रवादीने थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार (Complaint to Bribery Department) केली आहे.

या तक्रारीमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant jagatap)यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या गैर कारभाराची चौकशी करण्याची मागणीची तक्रार केली आहे.

यामध्ये 6 हजार कोटींच्या प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. स्थायी समितीची मुदत काही दिवसात संपणार आहे त्यासाठी एवढी घाई चाललीय का? असा सवाल जगताप यांनी केला होता.

Advertisement