पुणे – सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरच्या (harihareshwar) समुद्र किनाऱ्यावर काल एका संशयास्पद बोटीत (suspicious boat) शस्त्रास्त्रांचा साठा सापडला आणि अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. या बोटीत तीन एके 47 आणि 225 जिवंत काडतुसे (ak 47)सापडली. महाराष्ट्रात पुन्हा घातपात घडवण्याचा प्रयत्न तर नाही ना या भीतीने अवघ्या राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला.

हरिहरेश्वरच्या समुद्रात काल सकाळी 8 वाजता एक बोट हेलकावे खात होती. ते पाहण्यासाठी गावकऱयांनी किनाऱ्यावर गर्दी केली. होडीतून जाऊन या बोटीची पाहणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला.

बोटीत एक मोठा बॉक्स, तीन एके 47 रायफली आणि 225 जिवंत काडतुसे असल्याचे आढळले. त्यांनी तातडीने किनारा गाठून श्रीवर्धन पोलिसांना याची माहिती दिली. आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

या घटनेमुळे पोलीस यंत्रणांची मोठी तारांबळ उडाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीस देखील सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

रायगड मुंबईसह पुण्यात हाय अलर्ट (high alert in pune) जारी केला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नाकाबंदीही करण्यात आली आहे. आज दहीहंडीच्या उत्सावादरम्यान खबरदारीच्या उपाययोजना म्हणून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यशील आहेत. सर्व हॉटेल, लॉज, धर्मशाळा तसंच महत्वाच्या आस्थापना आणि संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे.

शिक्षणाचे माहेघर असणाऱ्या पुणे शहरात देखील जाजोगी पोलीस अधिकारी पाहायला मिळत आहेत. तसेच, दहीहंडीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे शहरात (high alert in pune) खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाय अलर्ट आणि कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, काल जप्त करण्यात आलेली संशयास्पद बोट आणि तीन एके-47 रायफल महाराष्ट्र ATS कडे देण्यात आलं आहे. याप्रकरणाची तपासणी आता महाराष्ट्र एटीएस करत आहे.