नवी दिल्ली – आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2022) खास तयारी करण्यात आली आहे. तर, नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं आहे.

तसेच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जनतेला संबोधित देखील केलं असून, त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आहे.

दरम्यान, आज देशाला स्वतंत्र होवून 75 वर्ष झाले तरीदेखील भारतातील मुलभूत बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. देशातील स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची बाब आहे.

आणि त्यासाठीच यंदा पुणेकरांनी (Pune city) 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा (Azadi Ka Amrit Mahotsav) भाग म्हणून दिवसभरात 75 जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. यात दोन स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे.

‘स्वच्छ’ आणि ‘सारे जहाॅं से अच्छा’ या दोन संस्थेमार्फत स्वच्छ आणि सुंदर पुण्याचं स्वप्न साकारणार आहेत. या अंतर्गत कचरा गोळा करणे, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण आणि वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहे.

यावेळी बस स्थानक, रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि मुळा मुठा नदीकाठी स्वच्छता मोहिमेसाठी एकूण 40 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच, प्लास्टिक, कपडे आणि ई-कचरा गोळा करण्यासाठी 12 केंद्र असतील. सारे जहाँ से अच्छा या स्वयंसेवी संस्थेतर्फे थुंकण्याविरुद्ध जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

शहरातील सर्व टेकड्या व्यापणाऱ्या प्रत्येक जागेवर किमान 10 वृक्षारोपण मोहिमेसह किमान 75 रोपे लावली जातील, असं संस्थेमार्फत सांगण्यात आहे.

दरम्यान, या मोहिमेत दोन संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शिवाय अनेक पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरी तिरंगा फडकणार आला असून,

आपल्या घराचा परिसरदेखील स्वच्छ ठेवणं सुजाण नागरीक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अनेकांच्या सहभागातून दिवसभरात ही मोहीम पार पडणार आहे. मोठ्या संख्येने पुणेकर (Pune city)या मोहिमेत सहभागी झाले आहेत.