पुणे – शिवसेनेचे (shivsena) आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil ) यांचा गोहाटी येथील तो डायलॉग सर्वत्र फेमस होताना दिसत आहे. अश्या त्यांच्या या डॉयलोग वरून पुण्यात बॅनर लागले असून याची सर्वत्र चर्चा आत्ता होऊ लागली आहे. “काय ते रस्त्यावरचे खडे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणी पट्टी वाढ, काय ती सम्राट सिटी, काय तो घोटाळा”. अश्या प्रकारचे बॅनर सध्या पुण्याच्या (pune) काही भागात आपल्याला पाहायला मिळत आहे.

पुणे महापालिकामध्ये 5 वर्ष भाजपची (bjp) सत्ता होती. या पार्श्वभूमीवर वाढलेल्या महसूल मुळे काँग्रेसचे सर चिटणीस संजय बालगुडे यांनी भाजप ला टोला लगावत ही बॅनर बाजी केली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे.

मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस तीनही पक्ष सत्ताधारी भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये.

पुणे महापालिकेत भाजप (bjp in pune) सरकारने पाणीपट्टी, घरपट्टी यामध्ये वाढवलेले दर आणि रस्त्यावरचे अपुरे काम आणि खड्डे या विषयांवर धरून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या संवादची चर्चा खूप होत आहे, काय ती झाडी काय तो डोंगर काय ते हॉटेल त्याच शैलीत आता पुणे शहरात बॅनर लावले आहेत.

“काय ते रस्त्यावरचे खडे
काय ती घरपट्टी वाढ
काय ती पाणीपट्टीत वाढ
काय ती स्मार्ट सिटी
काय ते कोट्यवधींचा घोटाळा..” अश्या प्रकारचा मजकूच ह्या बॅनरवर लिहला असून, पुणे शहरातील अनेक भागांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहे.