पुणे – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा (rain) सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, काही जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. तर पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) परिसरातही जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होत असून,

लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील 48 तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने

इंद्रायणी नदीकाठच्या (indayani river) गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे आता, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि. 14) पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) सर्व शाळ (schools closed) बंद राहणार आहेत.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार उद्या पुणे आणि पिपंरी चिंचवडमधील महापालिकांच्या शाळांसोबतच (schools closed) खासगी शाळांना देखील सुट्टी असणार आहे.

तसेच, नागरिकांनी आणि लहान मुलांनी आपल्या घरात थांबावे आणि काळजी घ्यावी असं देखील सांगण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे पुणे शहरात (pune city) अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.

पुणे जिल्ह्यातील चाकण, राजगुरूनगर, मंचर आणि नारायणगाव या भागांमध्ये (pune dist rain) देखील गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, बळीराजा सुखावला आहे.

असाच पाऊस चालू राहिला तर धरण क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.