पुणे – पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) एक मोठी दुर्घटना घडली आहे. महामार्गावर चुकीच्या दिशेने (Wrong Side) आलेल्या ट्रकने कारला धडक (Truck-Car Accident) दिल्याने भीषण अपघात झाला आहे. ही घटना रांजणगाव एमआयडीसीतील (MIDC) LG कंपनीसमोर झाली असून, या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पनवेलला जाण्यासाठी निघाले होते आणि रस्त्यातच ही घटना घडली.

दरम्यान, या अपघातानंतर पुणे-अहमदनगर (Pune-Ahmednagar Highway) महामार्गावर मोठी वाहातून कोंडी निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक पोलीस (police) आणि ग्रामस्थांच्या मदतीतीने पुन्हा एकदा वाहातून सुरळीत काण्यात आली.

मिळलेल्या माहितीनुसार, पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) आज पहाटे हा भीषण अपघात झाला, चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने पनवेलकडे निघालेल्या कारला समोरुन जोरदार धडक दिली,

ही धडक इतकी भयानक होती की, या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जगायचं मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रांजणगाव एमआयडीसीतील (MIDC) LG कंपनीसमोर हा अपघात झाला त्यावेळी फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मदत कार्य सुरु केले.

दरम्यान, एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावावर आणि परिसरावर हळहळ व्यक्त केली जात आहे. ही धडक इतकी भयानक होती की, कारमधील समोर बसलेले कारमध्येच अडकून पडले होते.

अपघातानंतर घटनास्थळी क्रेन आणून कार आणि ट्रक वेगवेगळे करण्यात आले. कारच्या समोरील भाग आत गेला होता, त्यामुळे कारच्या समोर बसलेले आताच अडकून पडले होते. मयत सर्व पनवेलला जाण्यासाठी निघाले होते.

मात्र, अपघात झाल्याचे समजताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे. दरम्यान, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून वेळोवेळी वाहन चालकांना नियमांबद्दल आहवन करण्यात आले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे :  

संजय भाऊसाहेब म्हस्के (वय 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय 45), राजू राम म्हस्के (वय 7 वर्षे), हर्षदा राम म्हस्के (वय ४ वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय 16 वर्षे) असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे असून,

साधना राम म्हस्के (वय 35) या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील सर्व आवाने बुद्रुक (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत.