पुणे – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील (maharashtra rain) अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, जिल्ह्यांमध्ये (pune dist) तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात (pune) आणि इतर परिसरात देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांची पाण्याची पातळी 4.51 टीएमसी झाली आहे.

गेल्या 24 तासांत वरसगाव पाणलोट क्षेत्रात 91 मिमी, पानशेत 92 मिमी, टेमघर 67 मिमी आणि खडकवासला 17 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चार धरणांमधील जलसाठा आता 4.51 टीएमसी झाला आहे.

धरणांच्या (Pune Dams) पाणलोट क्षेत्रात मंगळवारी 2.96 टीएमसी पाऊस झाल्याने बुधवारी सकाळी पाणीसाठा 3.67 टीएमसी होता.

मुठा नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या या धरणांमधील पाणीसाठा गेल्या आठवड्यात कमी पावसामुळे 2.5 टीएमसीवर गेला होता.

दरम्यान, पाऊस अद्याप सुरू असून धरणांमधील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

तर, पुणे शहरापाठोपाठ ग्रामीण भागात देखील पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, बळीराजा देखील सुखावला आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्येदेखील रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.

संततधार पावसामुळे शिवनेरी किल्ला (Shivneri fort) , माळशेज घाट आणि लेण्याद्री धुक्यात वेढले गेले आहेत. हिरवागार निसर्ग,

धुक्यांनी वेढलेला परिसर आणि धो धो पाऊस यामुळे शिवनेरीचे वैभव अतिशय विलोभनीय असेच दिसत आहे. पर्यटकांची पावले या परिसरात वळत आहेत.