पुणे – सध्या राज्यतील (maharashtra rain) अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, काही जिल्ह्यांमध्ये (pune dist) तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात (pune) आणि इतर परिसरात (pune gramin) देखील गेल्या आठवड्याभरापासून मुक्काम पावसाने ठोकला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला गुरुवारी (14 जुलै) मुसळधार पावसाचा लाल इशारा दिला आहे, तर आज (शुक्रवारी) नारंगी इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील माळीण (malin) परिसरात देखील जोरदार पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे माळीण येथील बुब्रा नदीला (Bubra River) पूर आला आहे.

बुब्रा नदीने (Bubra River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून, अनेक भागांमध्ये बळीराजाचे मोठे नुकसान सुद्धा आल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी माळीण गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली होती.

डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब होत.

माळीण गाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी गाव आहे. भिमाशंकर पासून 20 कि.मी आणि पुण्यापासून 75 कि.मी अंतरावर वसलेल्या

या गावची 7 वाड्यासहित लोकसंख्या 715. मूळ गावामधील 74 घरांपैकी 44 घरे, त्यातील 150 ते 165 पुरूष, स्त्री, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्या सहित संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होत.