पुणे – सध्या पुणे शहरात खड्ड्यांवरून (potholes) जोरदार राजकारण तापले असून, शहरातील अनेक भागात बॅनरबाजी आणि आंदोलन देखील करण्यात येत आहे. नुकतंच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) कडून स्वारगेट भागात एक आंदोल करण्यात आलं. खड्डेमुक्त (potholes) पुण्यासाठी आंदोलन करताना राष्ट्रवादीने (Pune NCP) तत्कालीन भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ‘पुण्याला खड्ड्यात घालणाऱ्या भाजपाचा (bjp) निषेध असो’, अशी घोषणाबाजी देण्यात आली.

तर, ज्या खड्ड्यांत पावसामुळे पाणी साचले आहे, त्या पाण्यात राष्ट्रवादीने कागदी बोट आणि प्लास्टिकचे मासे देखील सोडले होते. या खड्ड्यांमुळे पुढच्या काळात खरी बदके, होड्या सोडाव्या लागतील, असा टोलाही भाजपाला लगावण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख,संतोष नांगरे, विपुल म्हैसुरकर, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, श्वेता होनराव, अमोल ननावरे, संजय दामोदरे, विजय बगाडे, सोनाली उजागरे,

राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, योगेश पवार, मंथन जागडे,अर्जुन गांजे, आनंद बाफना, दिनेश खराडे बाळासाहेब अटल, रुपेश आखाडे,

मोहसीन काझी, गणेश दामोदरे, अर्जुन गांजे, आनंद बाफना, सचिन गांधी, नामदेव पवार, अर्जुन भिसे, संतोष पिसाळ, समीर पवार उपस्थित होते.

मात्र, काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील याच खड्ड्यांवरून (potholes) सर्वच भागात बॅनरबाजी करण्यात आली होती.

‘काय ते रस्त्यावरचे खडे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणी पट्टी वाढ, काय ती सम्राट सिटी, काय तो घोटाळा’. अश्या प्रकारचे बॅनर पुण्याच्या (pune) काही भागात लावण्यात आले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात (pune city) पावसाने विश्रांती घेतल्याने शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे महापालिकेने बुजविले आहेत. यावेळी तब्बल 777 खड्डे (potholes) बुजविण्यात आले आहेत.

मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांचे खड्डे (potholes) मुख्य पथ विभागाकडून बुजविले जात असले तरी लहान रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकडे क्षेत्रीय कार्यालयांकडून दुर्लक्ष केले जात आहे.